सुशीलकुमार शिंदेंना कायमचे घरी बसवा – प्रकाश आंबेडकर

0
397

सोलापूर , दि. १७ (पीसीबी) – सोलापूर लोकसभेचे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यातील पंचतारांकित हॉटेलमधील भेटीनंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. मात्र, त्यानंतर दोघांही उमेदवारांनी एकमेकांवर हल्ले प्रतिहल्ले केल्याने त्यांच्यातील लढत  अधिकच रंगदार होण्याची शक्यता आहे.  

शिंदे यांनी पत्रकार परिषदेत आंबेडकरांवर टीकास्त्र सोडले होते. त्यानंतर आंबेडकरांनी आज (बुधवार) पत्रकार परिषद घेऊन  सुशीलकुमार शिंदेंना  चोख उत्तर दिले आहे. शिंदे यांना कायमचे घरी बसवले पाहिजे, असे विधान आंबेडकर यांनी केले आहे.

आंबेडकर म्हणाले की, सोलापुरात प्रचारात आम्हाला चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकशाही टिकवण्यासाठी मी सोलापूर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. टेक्स्टाईल इंडस्ट्री आजारी इंडस्ट्री झाली आहे. तसेच  ही इंडस्ट्री क्राईम इंडस्ट्री  बनली आहे,  त्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांना कायमचे घरी बसवले पाहिजे, असेही आंबेडकर यावेळी  म्हणाले.