सुशांतसिंह प्रकरण: आता ड्रग्सअँगल मध्ये बॉलीवूडच्या ‘या’ बड्या अभिनेत्रीच नाव आलं समोर

0
393

मुंबई,दि.२२(पीसीबी) : बॉलिवूडचा अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यूप्रकरणाच्या तपासादरम्यान ड्रग्स अँगल समोर आला. मग या प्रकरणाचा तपास ड्ग्स कनेक्शनच्या दृष्टीने तपास एनसीबीद्वारे करण्यात येत आहे. दरम्यान, या प्रकरणी आता अनेक बड्या कलाकारांची नावं समोर येत आहेत. बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान या कलाकारांचं या प्रकरणी नाव पुढे आल्यानंतर आता बॉलिवूडची टॉपची अभिनेत्री दीपिका पदुकोण हिचंही नाव आता तपासादरम्यान ड्रग्स अँगल मध्ये समोर येतंय.

 

”ड्रग्स तस्करीची समस्या वाढत आहे. देशाच्या तरूण पिढीला ड्रग्सच्या माध्यमातून उद्ध्वस्त करण्यासाठी सापळे रचले जात आहे. आपले शेजारील देश यासाठी योगदान देत आहेत. दरवर्षी पाकिस्तान व चीनमधून पंजाब व नेपाळ मार्गे आपल्या देशात अंमली पदार्थांची तस्करी केली जात आहे.” असं भोजपुरी अभिनेते आणि भाजपा खासदार रवि किशन म्हणाले होते.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोद्वारे (एनसीबी) सुरू असलेल्या ड्रग्स प्रकरणाच्या तपासादरम्यान DNSK (D म्हणजे दीपिका पदुकोण, N म्हणजे नम्रता शिरोडकर, S म्हणजे श्रद्धा कपूर आणि K म्हणजे करिश्मा) ही नावं तपास दरम्यान समोर आली आहेत. एनसीबीच्या हाती एक व्हॉट्सअॅप चॅट मिळालं आहे. यामध्ये ड्रग्सच्या खरेदी-विक्रीची चॅट होती. ‘आज तक’ने या बदलच वृत्त दिलं आहे. एनसीबीकडून करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान मोठे गौप्यस्फोट करण्यात आले. यामध्ये मोठं मोठ्या अभिनेत्रीची नाव समोर आले आहेत.

एनसीबीने जया साहाच्या केलेल्या चौकशीदरम्यान चॅटवरील माहितीवरून ती सेलिब्रिटींसाठी सीबीडी ऑईल कुठून मागवते याची विचारणा केली. तसंच या चॅटमधील अमित आणि SLB या नावांबद्दलही चौकशी केली. जयाच्या मोबाईलमधील परत मिळवण्यात आलेल्या डेटामधून आणखी एक गौप्यस्फोटही झाला आहे.