सुशांतला ड्रग्ज पुरविल्याचा आरोप, NCB सहाय्यक दिग्दर्शकाच्या शोधात!

0
212

मुंबई , दि. ८ (पीसीबी): बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणात एक नवीन खुलासा झाला आहे. सुशांतचे माजी सहाय्यक दिग्दर्शक हृषिकेश पवार फरार झाल्याची बातमी आहे. एनसीबी हृषिकेश पवारचा शोध घेत आहे. हृषिकेशवर आरोप आहे की तो सुशांत सिंह राजपूतला ड्रग्ज पुरवत होता. यापूर्वी हृषिकेश पवारच्या वतीने मुंबई कोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करण्यात आला होता.

परंतु हायकोर्टाने पुन्हा सत्र न्यायालयात जाण्यास सांगितले. आणि गुरुवारी हृषिकेश पवारची याचिका फेटाळून लावली आहे. जेव्हा एनसीबीची टीम हृषिकेश पवारच्या चेंबूरच्या घरी गेली होती तेव्हा तो घरी नव्हता आणि त्यानंतर त्याला फरार म्हणून घोषित करण्यात आले आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी टाइम्स ऑफ इंडियाला माहिती देताना सांगितले की, ते हृषिकेशचा शोध घेत आहेत.

हृषिकेश पवारने काही काही काळ सुशांत सिंगसोबत काम केले. पण गेल्या वर्षी त्याला काढून टाकण्यात आले होते. गेल्या वर्षी बॉलिवूड ड्रग्स प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हृषिकेश पवारचे नाव समोर आले होते. सुशांतचे कर्मचारी दिपेश सावंतने सांगितले होते की, हृषिकेश पवार हा सुशांतला ड्रग्ज पुरवत होता.