Maharashtra

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा महाराष्ट्र पोलिसांचा इशारा

By PCB Author

June 15, 2020

मुंबई, दि.१५ (पीसीबी) – सुशांतने रविवारी (१४ जून) मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तो ३४ वर्षांचा होता. छोट्या पडद्यावरील मालिकांमध्ये काम करत त्याने करिअरला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुशांतने आत्महत्या का केली यामागील कारण अद्याप समजू शकलेले नसून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. 

आत्महत्येनंतर सुशांतच्या घरातील काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. यामध्ये सुशांतचा मृतदेह दिसत आहे. हिंदी चित्रपट सृष्टीमधील अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृतदेहाचे फोटो सोशल नेटवर्किंगवर शेअर करु नयेत असा इशारा महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर सेलने दिला आहे.

सुशांतच्या मृतदेहाचे फोटो शेअर करणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. इतकच नाही तर याआधी लोकांनी फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावे असे आवाहनही पोलिसांनी केले आहे.

सायबर सेलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन या फोटोंसंदर्भातील इशारा पोलिसांनी दिला आहे. या संदर्भात पोलिसांनी तीन ट्विट केले आहेत.  “सोशल मिडियावर एक धक्कादायक ट्रेण्ड महाराष्ट्रामधील सायबर सेलला सध्या दिसून येत आहे. सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतरचे फोटो सर्क्युलेट केले जात आहेत. हे फोटो धक्कादायक आणि शेअर करण्यासारखे नाहीत. अशाप्रकारचे फोटो शेअर करणे कायद्याच्या नियमांप्रमाणे गुन्हा आहे. न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसार अशाप्रकारच्या कृतीसाठी कायदेशीर करावाई केली जावू शकते. महाराष्ट्र सायबर सेल सर्वांना अशाप्रकारचे फोटो सर्क्युलेट करु नये असे आवाहन करत आहे. जर असे फोटो शेअर केले असतील तर ते डिलीट करावेत,” असे पोलिसांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

We've observed that certain users are using social media platforms for posting offensive / abusive / defamatory / malicious posts. Maharashtra Cyber Police Dept., the nodal agency for cyber crime investigation in Maharashtra hereby issues a notice under Section 149 of CRPC (1/n)

— Maharashtra Cyber (@MahaCyber1) May 20, 2020

A disturbing trend has been observed on Social Media platforms by Maharashtra Cyber that pictures of deceased actor Shri. Sushant Singh Rajput are being circulated, which are disturbing and in bad taste. (1/n)

— Maharashtra Cyber (@MahaCyber1) June 14, 2020