Entertainment

“सुशांतची आईदेखील डिप्रेशनची शिकार होती. त्यामुळेच सुशांतच्या आईचा मृत्यू झाला.” रियाची आणखीन उडवाउडवीची उत्तरे

By PCB Author

August 28, 2020

मुंबई, दि.२८ (पीसीबी) : सुशांतच्या मृत्यूनंतर रियाने पहिल्यांदाच आपली चुप्पी तिने सोडली असून या प्रकरणात तिच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचं तिने खंडन करत स्पष्टीकरण दिलं आहे. तसेच तिने अनेक खुलासेही केले आहेत. सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी असलेली रिया चक्रवर्तीने पहिल्यांदाच माध्यमांसमोर समोर आपली बाजू मांडली आहे. तिने एका खाजगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत बोलताना अनेक खुलासे केलेत. ‘मृत्यूपूर्वी सुशांत डिप्रेशनमध्ये होताच, पण त्याची आईदेखील मानसिक आजाराने ग्रस्त असल्याचं सांगितलं आहे.’ तसेच मानसिक आजारामुळेच सुशांतच्या आईचा मृत्यू झाल्याचा रियाने खळबळजनक खुलासा केला आहे.

रिया मुलाखतीत बोलताना म्हणाली की, ‘सुशांत आपल्या आईवर फार प्रेम करत होता आणि तो त्यांची नेहमी आठवण काढायचा. रियाने यावेळी सुशांतच्या वडिलांबाबत हेही खुलासे केले आहेत कि, सुशांतचे त्याचे वडिल के. के. सिंह यांच्यासोबत फारसे चांगले संबंध नव्हते. कारण त्याचे वडिल फार पूर्वीच त्याच्या आईला सोडून गेले होते. रियाने हेदेखील सांगितलं की, त्यांची आईदेखील कथित रित्या डिप्रेशनची शिकार होती. त्यामुळेच त्यांचा मृत्यू झाला. सुशांतचं त्याच्या वडिलांशी नातं फारसं चांगलं नसल्याने तो जवळपास 5 वर्ष आपल्या वडिलांना भेटला नव्हता.’

रियाच्या या वक्तव्यानंतर सुशांतची बहिण श्वेता सिंहने आपली प्रतिक्रिया देताना म्हंटल आहे कि, ‘कुटुंबातील सर्वच व्यक्ती सुशांतवर प्रेम करत होत्या. सुशांतचंही सर्वांवर खूप प्रेम होतं. सुशांतवर प्रेम होतं म्हणूनच त्याला बरं नसल्याचं समजताच मी त्याला भेटण्यासाठी अमेरिकेहून भारतात आले होते.’

रियाच्या या मुलाखतीवर सुशांतची मैत्रीण अंकिता लोखंडेने रिअॅक्शन देताना म्हंटले आहे कि,’ 2016 पर्यंत सुशांत अजिबात कोणत्याच डिप्रेशनमध्ये नव्हता. मी त्याच्या कुटुंबियांसोबत उभी आहे. सुरुवातीपासून शेवटपर्यंत, जोपर्यंत सुशांत आणि मी एकत्र होतो, 23 फेब्रुवारी 2016 पर्यंत. त्याला कोणत्याच प्रकारचं डिप्रेशन नव्हतं आणि त्याने डॉक्टरांशीही संपर्क साधला नव्हता. तो पूर्णपणे ठिक होता.’ असं अंकिताने आपल्या ट्विट मध्ये म्हंटल आहे.