सुशांतचा ‘छिछोरे’ ठरला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमा; ६७व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा

0
453

मुंबई, दि.२२ (पीसीबी) : 67व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यामध्ये सुशांत सिंह राजपूतच्या ‘छिछोरे’ या सिनेमाला सर्वोत्कृष्ट हिंदी सिनेमाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. चित्रपटगृहात प्रदर्शित झालेला सुशातंचा ‘छिछोरे’ हा शेवटचा सिनेमा होता.

2020 वर्ष हे करोनाच्या सावटाखाली आल्याने त्याचा फटका सिनेसृष्टीलादेखील बसला. अनेक सिनेमांचं प्रदर्शन रद्द करण्यात आलं तर काहींचं पुढे ढकलण्याक आलं. यामुळेच 2019 सालातील सिनेमांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे.

सुशांत सिंहच्या ‘छिछोरे’ सिनेमाला प्रेक्षकांनी चांगलीच पसंती दिली होती. खास करुन या सिनेमाचं कथानक प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं होतं. तसचं सुशांतच्या आत्महत्येनंतर हा सिनेमा पुन्हा चर्चेत आला तो म्हणजे या सिनेमाच्या कथानकामुळेच.

या सिनेमात अपयशाने खचून आत्महत्या करण्याऱ्या मुलांना अपयशाने खचून न जाता जीवनाकडे सकारात्मक दृष्टीकोनातून कसे बघायचे हे सुशांतने सांगितले होते. मात्र या सिनेमाच्या प्रदर्शानानंतर काही दिवसातच सुशांतने आत्महत्या केली. एकीकडे सिनेमामधून अनेकांना आत्महत्येपासून परावृत्त करणारा सुशांत आत्महत्येसाठी का प्रवृत्त झाला असे अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांना पडले होते.

या सिनेमात अभिनेत्री श्रद्धा कपूर त्याच्यासोबत दिसली होती. या सिनेमात पहिल्याच दिवशी तब्बल २९.७८ कोटी रुपयांची कमाई केली होती.

सुशांतने छोट्या पडद्यावरील मालिकेत काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात केली होती. २०१३ मध्ये ‘काइ पो चे’ या चित्रपटातून त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा पुरस्कारदेखील मिळाला होता. ‘शुद्ध देसी रोमान्स’, ‘डिटेक्टिव्ह ब्योमकेश बक्षी’, ‘एम. एस. धोनी : द अनटोल्ड स्टोरी’, ‘केदारनाथ’ यांसारख्या चित्रपटांमध्ये त्याने दमदार भूमिका साकारल्या आहेत.