Comedian Jagdeep in film SOORMA BHOPALI. Express archive photo

Maharashtra

‘सूरमा भोपाली’ काळाच्या पडद्याआड

By PCB Author

July 09, 2020

मुंबई दि.9 (पीसीबी ) : बॉलिवूडमधील प्रसिद्ध कॉमेडियन जगदीप म्हणजेच सैय्यद इश्तियाक अहमद जाफरी यांचं बुधवारी वृद्धापकाळाने निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्ष त्यांची प्राणज्योत मावळली.

जगदीप यांचा जन्म 29 मार्च 1939 रोजी मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात झाला होता. सैयद इश्तियाक अहमद जाफरी हे जगदीप यांचं खरं नाव आहे. जगदीप यांनी बाल कलाकार म्हणून अभिनयास सुरुवात केली. त्यांचा अफसाना हा पहिला चित्रपट होता. त्यानंतर बाल कलाकार म्हणून त्यांचे इतर चित्रपट अब दिल्ली दूर नही, मुन्ना व हम पंछी एक डाल के यामध्ये काम केलं. आपल्या हाव भावाने तसंच अभिनयाने दर्शकांना हसवणा-या जगदीश यांच्या भूमिकेचा अंदाज खूप वेगळाच होता.

त्यांनी 300 हून अधिक सिनेमांमध्ये काम करून आपल्या अभिनयाची मजबूत छाप सोडली. ‘दो बीघा जमीन’ या चित्रपटाद्वारे जगदीप यांनी विनोदी भूमिकेस सुरूवात केली. ‘शोले’ सिनेमातील त्यांच्या भूमिकेमुळे ते खूप प्रसिद्ध झाले. त्या सिनेमामुळे त्यांना ‘सूरमा भोपाली’ म्हणून ओळखण्यात आलं. त्यांचं हे नाव इतके प्रसिद्ध झालं की, त्यांनी या नावाने एका सिनेमाचे दिग्दर्शन देखील केलं.

मच्छर इन पुराना मंदीर, अंदाज अपना अपना, फिर वही रात, कुरबानी, शहनशाह यांसारख्या सिनेमांत काम केलं. अभिनेता जावेद जाफरी हे त्यांचे पुत्र आहेत.