सुरक्षेच्या कारणास्तव कुख्यात गुंड गजानन मारणे याची सातारा कारगृहात रवाणगी

0
1048

पुणे, दि. १५ (पीसीबी) – सुरक्षेच्या कारणास्तव येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड  गजानन मारणे याची रवानगी सातारा कारगृहात करण्यात आली आहे. या बाबतचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारीने दिला.

काही दिवसांपूर्वी गुंड गजानन मारणे याला न्यायालयात हजर करण्याचे आदेश असताना कारागृहाचे अधिक्षक यु. टी. पवार यांनी त्याला न्यायालयात हजर केले नाही. त्यासाठी पैसे आणि भेटवस्तूंची मागणी यु. टी. पवार यांनी केल्याची तक्रार मारणे याने न्यायालयात केली होती. याप्रकरणी न्यायालयाने पवार यांना कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती.

त्यानंतर मारणेचे वकील एड. एन. डी. पाटील आणि विजयकुमार ठोंबरे यांनी त्याला सुरक्षेच्या कारणास्तव दुसऱ्या कारागृहात हलविण्याची मागणी केली होती. त्यावेळी न्यायालयाने यासंदर्भात कारागृह उपमहानिरीक्षक स्वाती साठे यांना यासंदर्भात कारणे दाखवा नोटीस दिली होती. यासंदर्भात स्वाती साठे यांनी आपले लेखी म्हणणे सादर केले होते. त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी मारणे याला सातारा कारागृहात पाठवण्याचा आदेश दिला आहे.