सुरक्षा रक्षकाने केली चोरी; सव्वादोन लाखांचे दागिने चोरीला

0
179

भोसरी, दि. १२ (पीसीबी) – इमारतीची रखवाली करण्याचे काम करणा-या सुरक्षा रक्षकाने एका घरात चोरी करून दोन लाख 28 हजार 600 रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना भोसरी प्राधिकरण येथे गुरुवार (दि. 7) रात्री बारा ते शुक्रवार (दि. 8) सकाळी साडेनऊ वाजताच्या कालावधीत घडली.

विवेक अनंतराव चिद्दरवार (वय 61, रा. भोसरी) यांनी या प्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मिलन (पुर्ण नाव पत्ता माहीत नाही) याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे डॉक्टर असून त्यांचा वॉचमन/कामगार असलेल्या आरोपी मिलनकडे फिर्यादीच्या बिल्डींगची रखवालीची जबाबदारी होती. मिलनने फिर्यादीच्या घराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातून तीन तोळे आठ ग्रॅमचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, हातातील तीन घड्याळे, असा एकूण दोन लाख 28 हजार 600 रुपये किमतीचा ऐवज चोरी केला. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.