सुभाषचंद्र बोस यांची हत्या झाली होती, रशियाचे माजी राष्ट्राध्यक्षांचा हात; सुब्रह्मण्यम स्वामींचा दावा

0
693

अगरतळा, दि. ३० (पीसीबी) – आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांची हत्या करण्यात आली होती. यांच्या हत्येसाठी रशियाचे माजी राष्ट्राध्यक्ष जोसेफ स्टॅलिन  जबाबदार होते, असा खळबळजनक दावा भाजप नेते सुब्रह्मण्यम स्वामी यांनी केला आहे.

येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, बोस यांचा मृत्यू १९४५ मध्ये झालाच नाही. ही गोष्ट चुकीची आहे. हा (देशाचे पहिले पंतप्रधान) जवाहर लाल नेहरू आणि जपानींचा कट होता. नेहरूंना या सर्व गोष्टींची माहिती होती, असे सांगून नेताजींच्या आझाद हिंद सेनेमुळेच ब्रिटिशांनी भारताला स्वातंत्र्य दिले. ७५ वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये आझाद हिंद सेनेची स्थापना झाली होती असा दावा सुद्धा स्वामींनी यावेळी केला.

काश्मीरमध्ये लागू असलेले कलम ३७० राष्ट्रपती एक अध्यादेश काढून हटवू शकतात. या कलमात विशेष दर्जा मिळालेला असतो. तर अयोध्येत राम मंदिराच्या निर्मितीसाठी पुढचे मार्ग आणखी मोकळे झाले आहेत, असा दावा स्वामींनी यावेळी केला.