सुप्रिया सुळे उत्कृष्ट खासदार नव्हे, तर उत्तम सेल्फीपटू – विजय शिवतारे

0
623

पुणे, दि. ४ (पीसीबी) – राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या उत्कृष्ट खासदार नाहीत, तर फक्त उत्तम सेल्फीपटू आहेत,  अशी बोचरी टीका राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी केली आहे. याबाबत शिवतारे यांनी सुप्रिया सुळेंना एक खुले पत्र लिहिले आहे.  

या पत्रात  शिवतारे यांना सुप्रिया सुळेंना उत्कृष्ट सेल्फीपटू म्हटले आहे. कात्रज घाटात काम सुरु होण्यापूर्वी तुम्ही सेल्फी काढलात, त्यानंतर दुसरा सेल्फी काढलात तो फुरसुंगीला. खासदार म्हणून या प्रश्नी गडकरींकडे पाठपुरावा करण्याऐवजी सेल्फी काढण्यातच मग्न राहिलात. आम्ही राष्ट्रीय महामार्ग विभाग आणि गडकरींकडे पाठपुरावा करून हा रस्ता पूर्ण केला, असे शिवतारे यांनी पत्रात म्हटले आहे.

उत्कृष्ट खासदार सोडा पण उत्कृष्ट सेल्फीपटू आपण नक्की होऊ शकाल. सेल्फी, आरोग्य शिबिरं किंवा जिल्हा परिषदेच्या सायकली वाटायला खासदार होण्याची बिलकुल आवश्यकता नाही. कोपऱ्यावरच्या गणपती मंडळांचे अध्यक्ष अशी कामे नित्यनेमाने करत असतात. पवार चॅरीटेबल ट्रस्टच्या माध्यमातूनही आपण हे काम करू शकता. त्यासाठी  खासदारकीची जागा अडवून ठेवणे योग्य नाही, असेही शिवतारे यांनी या पत्रात म्हटले आहे.