सुपरस्टार रजनीकांत यांच्या शिरपेचात आणखी ‘एक’ मानाचा तुरा; सिनेसृष्टीत सर्वात मानाचा समजला जाणारा ‘हा’ पुरस्कार रजनीकांत यांना जाहीर

0
389

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेते रजनीकांत यांना ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ जाहीर करण्यात आला असून यासंबंधीची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे. हा पुरस्कार सिनेसृष्टीतील एक मानाचा पुरस्कार समजला जातो.

सिनेसृष्टीत महत्वाची कामगिरी करणाऱ्या अभिनेत्याला दरवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित केलं जात. यावर्षीचा हा पुरस्कार अभिनयातील देव, सुपरस्टार रजनीकांत यांना जाहीर करण्यात आला आहे. प्रकाश जावडेकर यांनी दिल्लीतील पत्रकार परिषदेत याची घोषणा करत ट्विट देखील केले आहे. ते म्हणाले कि, ”भारतीय सिनेसृष्टीतील महान अभिनेता रजनीकांतजी यांना 2019 सालातील दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर करताना आंनद होत आहे. त्यांचं अभिनेता, निर्माता आणि पटकथा लेखक म्हणून असलेलं योगदान महत्वाचं आहे.”

रजनीकांत यांचा अभिनयामध्ये हातखंडा आहे. त्यामुळे त्यांचे करोडो चाहते आहेत. गेली 30 वर्ष रजनीकांत चाहत्यांचं भरभरून मनोरंजन करत आहेत. आणि रसिक प्रेक्षक त्यांना भरभरून प्रेम करत आहेत. नाटकांमधून रजनीकांत यांनी त्यांच्या अभिनयाची कारकिर्दीची सुरूवात केली. कन्नड नाटकांमध्ये त्यांनी त्यांच्या अभिनयाची छाप पाडली. त्यानंतर ते तामिळ सिनेमांकडे वळाले यासाठी रजनीकांत यांना तामिळ भाषेचे धडे घ्यावे लागले. त्यांनी फकीर तामिलच नाहीतर मल्याळी, हिंदी, इंग्रजी, बंगाली सिनेमातूनही आपल्या अभिनयाची छाप सोडली.