सुनेच्या हत्येचा कट रचणाऱ्या सासऱ्याचाच मारेकऱ्यांनी केला खून

0
295

खेड, दि.५ (पीसीबी) : सुनेच्या हत्येचा कट रचणाऱ्या सासऱ्याचा मारेकऱ्यांनी गळा आवळून खून केला. ही घटना खेड तालुक्यातील वराळे येथे सोमवारी (दि.30) घडली. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी दोन जणांना अटक करण्यात आली आहे. चाकण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद अंबादास क्षीरसागर (वय 38) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

विनायक भिकाजी पानमंद असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यापैकी मोहम्मद वसीम जब्बार, मोहम्मद शहाजा इस्लाम उर्फ छोटू (दोघेही रा. मुंगेर, बिहार) यांना अटक करण्यात आली आहे. तर, अविनाश बबन राठोड (रा. जिंतूर, परभणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विनायक भिकाजी पानमंद याने त्याचा मुलगा अजित याची दुसरी बायको सीमा हिच्या हत्येचा कट रचला. त्यासाठी आरोपी अविनाश बबन राठोड याला सूनेचा खून करण्यासाठी व उत्तरप्रदेश येथून पिस्तूल आणण्यासाठी मोबदला म्हणून 1 लाख 34 हजार रुपये दिले. पैसे घेऊनसुध्दा अविनाश सून सीमा हिची हत्या करीत नसल्याने मयत विनायक याने आरोपी अविनाश याच्याकडे पैसे परत कर किंवा सून सीमा हिची हत्या कर, असा तगदा लावला.आरोपी अविनाश याने त्याचे मित्र मोहम्मद वसीम जब्बार, मोहम्मद शहाजा इस्लाम यांच्यासोबत विनायक पानमंद यांच्या हत्येचा कट रचला. त्यानुसार विनायक पानमंद यांना वराळे येथे बोलवून कापडी बेल्टने त्याचा गळा आवळला. मध्येच बेल्ट तुटल्याने आरोपी अविनाशने त्यांचा हाताने गळा आवळून खून केला. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे.