राष्ट्रवादीचे नेते सुनिल तटकरेंना जीवे मारण्याची धमकी; पत्रामुळे खळबळ   

0
569

रायगड, दि. २२ (पीसीबी) –  राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आणि माजी मंत्री तसेच रायगड लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार सुनिल तटकरे यांना जीवे मारण्याची धमकी  देण्यात आली  आहे. रायगड जिल्ह्यातील म्हसळा येथील पक्ष कार्यालयात या धमकीचे पत्र मिळाले आहे.

ही धमकी पूर्ववैमनस्यातून देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. याबाबत पक्षाचे अल्पसंख्याक विभागाचे जिल्हाध्यक्ष नाझीम हासवारे यांनी  म्हसळा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

बाळासाहेब भाऊसाहेब सातपुते, मु. पो. वडगांव तांदळी, जि. अहमदनगर या गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीची मदत घेऊन तटकरे यांना मारण्याचा कट रचला जात  आहे, असे या धमकी पत्रात  म्हटले आहे. या पत्रामुळे तटकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाची भावना व्यकत् केली जात आहे. तर रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.  पोलिसांनी  या पत्राबाबत तपास सुरू केला असून संबंधित व्यक्तीचा शोध  घेतला जात  आहेत.