Notifications

सुजय विखे पाटील डॉक्टर कसा झाला मला माहीत आहे – डॉ. अशोक विखे

By PCB Author

April 17, 2019

अहमदनगर, दि. १७ (पीसीबी) – ज्येष्ठ नेते बाळासाहेब विखे यांच्यावर उपचार करण्यात विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे, शालिनी विखे व डॉ. सुजय विखे यांनी हेळसांड केली. पाच डॉक्टरांचा सल्ला डावलून सुजय यांनी आजारी बाळासाहेबांना लोणीला परत आणले. स्वत: हेलिकॉप्टरमधून फिरत असताना वडिलांना रुग्णवाहिकेतून आणले, असा खळब‌ळजनक आरोप विखे यांचे ज्येष्ठ बंधू डॉ. अशोक विखे यांनी केला. वडिलांचा अंत्यविधी करण्याचा आपला अधिकारही धाकटे बंधू विखेंनी हिरावून घेतल्याचे ते म्हणाले.