Maharashtra

सुजय विखे-पाटलांच्या प्रवेशानंतर रणजितसिंह मोहिते पाटील भाजपच्या गळाला; गिरीश महाजनांची घेतली भेट

By PCB Author

March 12, 2019

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – काँग्रेस नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांचे पुत्र सुजय विखे-पाटील यांनी आज भाजप प्रवेश  केला. तर दुसरीकडे माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान खासदार विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील हे सुद्धा  भाजपमध्ये प्रवेश करण्याची चर्चा सुरू झाली आहे.

माजी राज्यसभा सदस्य असलेले  रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. त्यामुळे रणजितसिंह मोहिते पाटील हेही भाजपाच्या गळाला लागल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

दरम्यान, सुजय यांनी भाजपप्रवेश केल्याने काँग्रेसला मोठी धक्का बसला आहे. तर रणजितसिंह मोहिते पाटील यांनीही  भाजपप्रवेश केला. तर लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर  राष्ट्रवादी आणि काँग्रेससाठी हा मोठा धक्का असेल, असे मानले जात आहे.