सुजय भाजपमध्ये गेला, आता तुम्ही शिवसेनेत या; संजय राऊतांची राधाकृष्ण विखेंना ऑफर  

0
563

मुंबई, दि. १२ (पीसीबी) – सुजय विखे-पाटील यांचा आज (मंगळवार) भाजप प्रवेश झाल्यानंतर  त्यांचे वडील काँग्रेस नेते व विधानसभेचे विरोधीपक्ष नेते   राधाकृष्ण विखे-पाटील यांना शिवसेनेत  येण्याची ऑफर देण्यात आली आहे.

सुजय भाजपमध्ये गेला आहे आता तुम्ही शिवसेनेत यावे आणि युती मजबूत करावी, असे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे. यापूर्वी बाळासाहेब आणि राधाकृष्ण विखे-पाटील शिवसेनेचे  मंत्री होते.   आता त्यांची तिसरी पिढी युतीत आली आहे. ही चांगली बाब  आहे, असे राऊत यांनी म्हटले आहे.

जे आपले घर सांभाळू शकत नाहीत, त्यांनी राजकारणात संयम ठेवायचा असतो, असे सांगून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका करताना त्यांनी भान ठेवायला हवे होते. आता राज्य सरकारवर टीका करण्याचा नैतिक अधिकार राधाकृष्ण विखेंना राहिलेला नाही,  त्यामुळे त्यांनी आता शिवसेनेतच यावे, असे राऊत म्हणाले.