सीमेवरील घुसखोरी रोखणारे रीसॅट-२बी उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

0
424

श्रीहरिकोटा, दि. २२ (पीसीबी) – इस्रोने आज पीएसएलव्ही-सी४६ सोबत RISAT-2B हा अत्यंत महत्त्वाचा उपग्रह अंतराळात लॉन्च केला. पृथ्वीची निगराणी करणाऱ्या या उपग्रहाद्वारे भारत-पाकिस्तान सीमेवर वॉच ठेवण्यात येणार असून सीमेपलिकडून भारतात होणारी घुसखोरीही रोखता येणे शक्य होणार आहे. याशिवाय शेती, वन आणि आपत्कालीन परिस्थितीत मदत करण्यासाठीही या उपग्रहाचा उपयोग होणार आहे.

आज पहाटे ५ वाजता श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून PSLVC46चे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. त्यानंतर PSLVC46ने पृथ्वीची निगरानी करणाऱ्या RISAT-2B या उपग्रहाला पृथ्वीच्या खालच्या कक्षेत यशस्वीपणे सोडले. रीसॅट-२बी मुळे हवामानाचा अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे नैसर्गिक संकटाचा सामना करणे सोपे जाणार आहे. रीसॅट-२बी सोबतच सिंथेटिक अपर्चर रडारही अंतराळात लॉन्च करण्यात आले आहे. त्याचा दूरसंचार क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.