सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर

0
651

नवी दिल्ली, दि. ६ (पीसीबी) – सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन बोर्डाने (सीबीएसई) इयत्ता दहावीचे निकाल आज (सोमवार) दुपारी जाहीर केले. इयत्ता १२वीच्या निकालाप्रमाणेच आज इयत्ता १० वीचे निकाल जाहीर करताना सीबीएसईने  आश्चर्याचा धक्का  दिला आहे. निकाल  जाहीर करण्याबाबत सीबीएसईने कोणतीही पूर्वसूचना दिली नव्हती.

आज अचानक दुपारी ३ वाजता निकाल लावणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होता.  मात्र, सीबीएसईने २ वाजता निकाल जाहीर केला. विद्यार्थी इयत्ता १०वीचा निकाल http://cbseresults.nic.in/class10/Class10th19.htm या साइटवर भेट देऊन पाहू शकतात.

यंदा दहावीचा निकाल ९१. १ टक्के लागला आहे.  महाराष्ट्राचा समावेश असलेल्या चेन्नई विभागाचा निकाल ९९ टक्के लागला.  इयत्ता १० वीमध्ये एकूण १३ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९९ गुण मिळवून अव्वल स्थान प्राप्त केले आहे. तर, २४ विद्यार्थ्यांनी ५०० पैकी ४९८ गुण मिळवले आहेत.

फेब्रुवारी-मार्च महिन्यात झालेल्या परीक्षेला देशभरात १८ लाख विद्यार्थी बसले होते. गेल्या वर्षी १६ लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. गेल्या वर्षी विद्यार्थी उत्तीर्ण होण्याचे प्रमाण ८८.६७ टक्के इतके होते. गतवर्षीच्या तुलनेत यंदाच्या वर्षी पास होण्याचे प्रमाण ४.४० टक्क्यांनी वाढले आहे.

दहावीची  निकाल असा पाहता येणार

विद्यार्थी सीबीएसईची अधिकृत वेबसाइट results.nic.in, cbseresults.nic.in  आणि  cbse.nic.in वर निकाल पाहू शकतात. या व्यतिरिक्त विद्यार्थी मायक्रोसॉफ्ट अॅप- एसएमएस ऑर्गनायझरद्वारेही निकाल पाहू शकतात.  या साठी त्यांना आपला रोल नंबर, जन्मतारीख आणि शाळेचा कोड रजिस्टर करावा लागणार आहे.