सीबीआय मुख्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन; राहुल गांधींना अटक

0
518

नवी दिल्ली, २६ (पीसीबी) – राफेल घोटाळा दडपण्यासाठी दोन सीबीआय अधिकाऱ्यांना हटवल्याच्या निषेधार्थ काँग्रेसने आज (शुक्रवार)  नवी दिल्लीतील सीबीआय मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. काँग्रेस अध्यक्ष  राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली हजारो काँग्रेस कार्यकर्त्यांनी  यावेळी जोरदार घोषणाबाजी दिली. यावेळी राहुल गांधी यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केली. 

आज सकाळी राहुल यांच्या नेतृत्वाखाली दयाल कॉलेजपासून सीबीआय मुख्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला.  ‘चौकीदार चोर है’च्या घोषणा यावेळी देण्यात आल्या. यावेळी ज्येष्ठ नेते शरद यादव आणि मार्क्सवादी नेते डी. राजा आणि तृणमूलचे नेतेही उपस्थित होते.

या आंदोलनामुळे सीबीआय मुख्यालयासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निदर्शने सुरू असतानाच राहुल यांनी स्वत:ला अटक  करून घेतले. ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत आणि प्रमोद तिवारी यांच्यासह शेकडो काँग्रेस कार्यकर्त्यांनीही अटक करण्यात आली. त्यांना लोधी रोड पोलीस ठाण्यात  नेण्यात आले.