सीबीआयमधील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्यात रिपोर्ट सादर

0
511

दिल्ली, दि. १२ (पीसीबी) – केंद्रीय दक्षता आयोगाने (सीव्हीसी) सीबीआयमधील वादाप्रकरणी सुप्रीम कोर्टात बंद लिफाफ्यात रिपोर्ट सादर केला आहे. याप्रकरणी सुप्रीम कोर्टाने शुक्रवारी पुढील सुनावणी होणार असल्याचे म्हटले आहे.

लाचखोरी प्रकरणात सीबीआयप्रमुख आलोक वर्मा आणि दुसऱ्या क्रमांकावरील अधिकारी राकेश अस्थाना यांना २३ ऑक्टोबरला सकतीच्या रजेवर पाठवण्यात आले होते. अस्थाना यांनी वर्मा यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप केला होता. केव्ही चौधरी यांच्या नेतृत्वातील दक्षता आयोगाच्या ३ सदस्यीय समितीने अस्थाना यांचे सर्व आरोप फेटाळले. सुट्टीवर पाठवल्यानंतर वर्मा यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती.