Entertainment

सीबीआयकडून तिसर्‍या दिवशीही रियाची चौकशी; रियाच्या उत्तरातून सीबीआय असंतुष्ट. दोन दिवसांत तब्बल 17 तास चौकशी

By PCB Author

August 30, 2020

मुंबई, दि. ३०(पीसीबी) : बॉलिवूड स्टार सुशांतसिंह राजपूत मृत्यूच्या प्रकरणी सीबीआय रिया चक्रवर्तीची चौकशी करत आहे. सीबीआयनं शनिवारी रिया चक्रवर्तीची कसून चौकशी केली. परंतु, रियाच्या दिलेल्या उत्तरातून सीबीआय संतुष्ट नाहीये. सीबीआय आणखी माहिती काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे रियाला आज सलग तिसऱ्या दिवशीसुद्धा चौकशीसाठी बोलवण्यात येतं आहे.

शनिवारी चौकशीसाठी रिया डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहोचण्यापूर्वी सुशांत सिंग प्रकरणी संबंधीत सर्व जण उपस्थित होते. यांमध्ये सॅम्युअल मिरांडा, सिद्धार्थ पिठानी, नीरज सिंग यांचीदेखील सीबीआयने चौकशी केली आहे. सुशांत सिंह राजपूततच्या बँक खात्यांच्या ऑडिटमध्ये महत्त्वाचे खुलासे समोर आले आहेत. सुशांतच्या बँक अकाऊंटमधून 70 कोटींची उलढाल मागच्या पाच वर्षांमध्ये झाली आहे. म्हणजे सुशांतच्या अकाऊंटमध्ये 70 कोटी रुपये आले आणि खर्च झाले आहेत. या ऑडिट रिपोर्टमुळे एक गोष्ट स्पष्ट होती की, सुशांत आपलं आयुष्य अगदी मनसोक्त आणि हवं तसं जगत होता. स्वत:वर, मित्रांवर, कुटुंब आणि घरातल्या नोकरावरसुद्धा सुशांत अगदी सहज आणि हवे तसे पैसे खर्च करत होता. मुंबई पोलिसांनी सुशांतच्या बँक खात्यांचा फॉरेन्सिक ऑडिट रिपोर्ट केला आहे. ज्यामध्ये ‘Grant Thornton’ नावाच्या कंपनीच्या ऑडिट रिपोर्टमध्ये समोर आलं की, सुशांतच्या अकाऊंटमधून रियाच्या अकाऊंटमध्ये कुठल्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक ट्रान्झॅक्शन झालेलं नाही.

तरीदेखील सीबीआय चौकशी चालूच आहे. रियाकडून उडवाउडवीची उत्तर मिळत असून तिने दिलेल्या उत्तरांमुळे सीबीआय समाधानी नाही आहे. रिया सिबीआयला को-ऑपरेट करत नसल्याचं यावरून स्पष्ट होतय.