सी पी जोशींचे बेताल वक्तव्य: मोदी आणि उमा भारतींचा धर्म कोणता? धर्माबद्दल फक्त ब्राम्हणांनाच माहिती

0
511

नवी दिल्ली, दि. २३ (पीसीबी) – राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात काँग्रेस नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सी पी जोशी यांनी नरेंद्र मोदी आणि उमा भारती यांच्या जात आणि धर्मावर प्रश्न उपस्थित केले आहे. धर्माबद्दल फक्त ब्राम्हणांनाच माहित असते, असेही त्यांनी म्हटले आहे.

सी पी जोशी यांनी प्रचारसभेत धर्म, जात यावरून भाजपावर टीका केली. मात्र, टीका करताना बेताल विधान करून जोशी यांनी वाद ओढावून घेतला. उमा भारती कोणत्या जातीच्या हे माहित आहे का कोणाला?, ऋतंभरा यांची जात कोणाला माहित आहे का?, या देशात धर्माबद्दलची माहिती फक्त ब्राम्हणांना आहे. उमा भारती लोधी समाजाच्या आहेत आणि त्या हिंदू धर्मावर भाष्य करतात. साध्वीजी कोणत्या धर्माच्या आहेत, त्या हिंदू धर्मावर बोलत आहे. नरेंद्र मोदींचा धर्म काय आणि ते हिंदुत्वावर बोलत आहे. ५० वर्षांत त्यांच्या ज्ञानात भरच पडली नाही, असे त्यांनी म्हटले आहे.

काँग्रेस पक्ष हिंदू नाही, असं ते म्हणतात. पण त्यांना प्रमाणपत्र वाटत फिरण्याचा अधिकार कोणी दिला?, त्यांनी काय विद्यापीठ सुरु केले आहे का?, असा सवाल त्यांनी भाजपाला उद्देशून विचारला. सरदार पटेल हे पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या मंत्रिमंडळात होते. पटेल यांनी नेहमीच नेहरुंना पाठिंबा दिला. नेहरुंच्या परवानगीशिवाय ते कोणतेही निर्णय घेत नव्हते. पण आज लोकांमध्ये नेहरु- पटेलांमध्ये मतभेद होते, अशी चुकीची माहिती पसरवली जात आहे, असे त्यांनी नमूद केले.  या विधानावरुन वाद निर्माण होताच त्यांनी स्पष्टीकरणही दिले. ‘माझ्याविधानाचा चुकीचा अर्थ काढण्यात आला असून भाजपा याचाच वापर करत आहे, असे त्यांनी नमूद केले