सीपी जोशींचा २००८ मध्ये एका मताने पराभव; यावेळी १० हजार मतांनी विजय  

0
1001

जयपूर, दि. ११ (पीसीबी) – राजस्थानातील २००८ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने पराभूत झालेले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सीपी जोशी यावेळी आमदारपदी निवडून आले आहेत. राजस्थानातील नाथद्वारा मतदारसंघातून सीपी जोशी रिंगणात होते. त्यांनी १० हजार ४३९ च्या मताधिक्याने भाजपचे उमेदवार महेश प्रताप सिंह यांचा पराभव केला. जोशी यांनी राजस्थानातील भिलवाडा मतदारसंघातून खासदारकी भूषवली आहे. तर यापूर्वी ४ वेळा ते आमदार राहिले आहेत.

२००८ च्या विधानसभा निवडणुकीत केवळ एका मताने भाजपच्या कल्याण सिंह यांनी सीपी जोशींना पराभूत केले होते. कल्याण सिंह यांना त्यावेळी ६२ हजार २१६ मते पडली होती, तर जोशींनी तेव्हा ६२ हजार २१५ मते मिळवली होती. तर यावेळी सीपी जोशींच्या समोर ८ उमेदवारांचे आव्हान होते. ११ वर्षांनी भाजपमध्ये परतलेल्या महेश प्रताप सिंह यांनी जोशींसमोर तगडे आव्हान उभे केले होते.