सीताराम केसरींना उचलून फेकल्याचे देशाला माहीत; मोदींचा काँग्रेसला पलटवार  

0
469

रांची, दि. १८ (पीसीबी) –बिगर गांधी-नेहरू घराण्यातील व्यक्तीला काँग्रेसचा ५ वर्षे अध्यक्ष बनवून दाखवण्याच्या काँग्रेसच्या उत्तराला पंतप्रधान मोदींनी प्रत्युत्तर दिले आहे. मागासवर्गीय नेते सीताराम केसरींना त्यांनी अध्यक्ष बनवले होते. त्यांना कशा पद्धतीने उचलून फेकून सोनिया गांधींना अध्यक्षपदी बसवले होते, हे देशाला माहीत आहे, अशा शब्दांत मोदींनी काँग्रेसवर पलटवार केला आहे.  

छत्तीसगडमधील महासमुंद येथील निवडणूक प्रचारसभेत बोलताना त्यांनी जनतेला पुन्हा एकदा भाजपला संधी देण्याचे आज (रविवार) आवाहन केले. यावेळी बोलताना त्यांनी काँग्रेसवर तोफ डागली. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी मोदींच्या आव्हानाला उत्तर देत गांधी कुटुंबाबाहेरील अध्यक्षांच्या नावांची यादी सादर केली होती. यावर मोदींनी आज काँग्रेसवर निशाणा साधला.

तत्कालीन मनमोहन सिंग सरकारला रिमोट कंट्रोलचे सरकार अशी उपमा देत त्यांनी काँग्रेसवर टीका केली.  बिगर गांधी कुटुंबाबाहेरील व्यक्तीला ५ वर्षांपर्यंत अध्यक्ष बनवण्याच्या आपल्या विधानावर काँग्रेसने दिलेल्या उत्तरावरही त्यांनी  यावेळी उत्तर दिले.