Maharashtra

सीएएला घाबरण्याचे काहीही कारण नाही – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

By PCB Author

February 22, 2020

दिल्ली, दि.२१ (पीसीबी) – काल शुक्रवारी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि ज्येष्ठ भाजपा नेते लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेतली.

याच पार्श्वभूमिवर या भेटीनंतर उद्धव ठाकरेंनी दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी बोलत असताना उद्धव ठाकरे यांनी, CAA ला घाबरण्याची गरज नाही. हा कायदा नागरिकत्व देण्याचा कायदा आहे असं वक्तव्य केले. उद्धव ठाकरेंच्या याच वक्तव्याचा धागा पकडत मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर बोचरी टीका केली आहे.

मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले, लोकसभेत शिवसेनेने CAA ला आपला पाठींबा दर्शवला होता. मात्र राज्यसभेत शिवसेना खासदारांनी CAA, NRC वर प्रश्नचिन्ह निर्माण केले होते.

लोकसभेत CAA NRC ला पाठिंबा राज्यसभेत विरोध , पुन्हा मोदींना भेटल्यानंतर पाठिंबा ,वाघ आहे का बेडूक…..

— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) February 22, 2020

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले, सीएए, एनपीआर, एनआरसीच्या मुद्द्यांवर पंतप्रधानांसोबत माझी चर्चा झाली. या मुद्द्यांवर यापूर्वीच मी माझी भूमिका सामना मध्ये मांडली आहे. सीएएला घाबरण्याचे काहीही कारण नाही. हा कायदा कुणालाही देशातून काढण्यासाठीचा कायदा नाही. एनआरसीबाबत जे वातावरण तयार केले जातं आहे की मुस्लिमांनाच त्रास होणार ते चुकीचे आहे. सगळ्यांनाच आपल्या नागरिकत्वासाठी रांगेत उभे रहावे लागणार आहे. या मुद्द्यावरुन ज्यांनी आंदोलन भडकवलं आहे त्यांनी कायदा आणि इतर गोष्टी समजून घ्यायला हव्यात.