सिलेंडरच्या टाकीमध्ये धोकादायकरीत्या गॅस भरत होता; पोलिसांना मिळाली माहिती आणि…

0
205

चाकण, दि. १२ (पीसीबी) – धोकादायकरीत्या मोठ्या गॅसच्या टाकीमधून लहान गॅसच्या टाकीमध्ये गॅस भरणा-या एका तरुणाला म्हाळुंगे पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 14 हजार 200 रुपयांचा गॅस साठा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई रविवारी (दि. 10) सायंकाळी खराबवाडी येथे करण्यात आली.

भीमा बाळू चव्हाण (वय 23, रा. वाघजाईनगर, खराबवाडी, ता. खेड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस नाईक जयकुमार शिकारे यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भीमा मोठ्या गॅस सिलेंडरच्या टाकीमधून लहान सिलेंडरच्या टाकीमध्ये धोकादायकरीत्या गॅस भरत होता. यामुळे आसपासच्या परिसरात राहणा-या लोकांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता होती. याबाबत माहिती मिळाल्याने पोलिसांनी कारवाई करत भीमाला अटक केली. त्याच्याकडून 14 हजार 200 रुपयांचा गॅस साठा जप्त करण्यात आला आहे. त्याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम 285, जीवनावश्यक कायदा कलम 3 व 7 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.