Entertainment

‘सिरीयस मॅन’ प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज; नवाजुद्दीन सिद्दीकी घेणार आता दमदार एन्ट्री

By PCB Author

September 20, 2020

मुंबई,दि.२०(पीसीबी) : बॉलीवूड अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी ‘सीरियस मॅन’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. यात नवाजुद्दीन हा एका सर्वसामान्य नागरिकाची भूमिका साकारत आहे.

‘सिरीयस मॅन’ हा चित्रपट मनू जोफेस यांच्या पुस्तकावर आधारित असून नवाजुद्दीन सिद्दीकी अयान मणी नामक व्यक्तीची भूमिका साकारत आहे. नवाजुद्दीन सिद्दीकी ‘सिरीयस मॅन’ या चित्रपटात एका सामान्य नागरिकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटामध्ये चार पिढींमधील बदल दाखवण्यात आला आहे. या चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर असं वाटतं आहे की, एज्यूकेशन सिस्टीमवर आधारित हा चित्रपट असेल.

या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी सोबत एम. नस्सार, इंदिरा तिवारी आणि अकाशथ दास यांच्या देखील मुख्य मत्त्वाच्या भूमिका आहेत. ‘सिरीयस मॅन’ येत्या 2 ऑक्टोंबरला नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात येणार आहे.