Pimpri

सिनेट निवडणुकीसाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार – अजित गव्हाणे..

By PCB Author

July 02, 2022

पिंपरी, दि. २ (पीसीबी) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. सिनेट निवडणुकीसाठी पिंपरी-चिंचवड शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करणार असल्याचे राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले.

या बैठकीस शहर संघटक अरुण बोऱ्हाडे , माजी नगरसेवक नाना काटे, विद्यार्थी प्रदेश अध्यक्ष सुनील गव्हाणे, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख , युवती अध्यक्ष वर्षा जगताप, खजिनदार दीपक साकोरे, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, शक्रूल्ला पठाण, पर्यावरण सेल अध्यक्ष विनय शिंदे, सेवादल अध्यक्ष महेश झपके, मा. नगरसेवक नारायण बहिरवाडे, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, संगीता ताम्हाणे, पल्लवी पांढरे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रय जगताप, महीला संगटीका कविता खराडे, युवा नेते शाम जगताप, पोपट पडवळ, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला आदी उपस्तिथ होते.

अजित गव्हाणे म्हणाले की, पदवीधर आमदारकीप्रमाणे शहर राष्ट्रवादीनेसिनेट निवडणूक गांभीर्याने लढवण्याची ठरवले आहे. यासाठी शहरातून 15 हजार पदवीधरांची नोंदणी करण्याचे ध्येय शहर राष्ट्रवादीने ठेवले आहे.

राष्ट्रवादी प्रदेशचे विध्यार्थी आघाडीचे अध्यक्ष सुनील गव्हाणे, शहर राष्ट्रवादी शिक्षक सेलचे अध्यक्ष डॉ. संदीप तापकीर यांनी पदवीधरांची नोंदणी कशीकरायची याबद्दल मार्गदर्शन केले. पदवीधर संघाचे शहराध्यक्ष माधव पाटील यांनी सिनेट निवडणूक कामहत्वाची हे सांगितले.

माधव पाटील म्हणाले की शहरातून सिनेटवर एक तरी प्रतिनिधी निवडून जावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केलपाहिजेत. शहरातील विद्यार्थ्यांना विद्यापीठातील अनेक योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी शहर राष्ट्रवादीने पदवीधरांची नोंदणी केली पाहिजे.