सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास पाच लाखांचे बक्षीस देणार – बजरंग दल

0
1047

आग्रा, दि. २१ (पीसीबी) – काँग्रेस नेते आणि पंजाबचे कॅबिनेट मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी पाकिस्तानी लष्कर प्रमुख जनरल बाजवा यांना अलिंगण दिल्यामुळे बजरंग दलाने सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला असून बजरंग दलाचा आग्रा जिल्हाध्यक्ष संजय जाट याने सिद्धू यांचा शिरच्छेद करणाऱ्यास ५ लाखांचे इनाम देण्यात येईल अशी घोषणा केली आहे.

या व्हिडीओ मध्ये सिद्धू हे विश्वासघातकी आहेत. त्यांचे कृत्य माफ करण्यासारखे नाही. त्यांच्याविरोधात राजद्रोहाचा गुन्हा दाखल व्हावा. गुरू गोविंद सिंग यांची शिकवण सिद्धू विसरले आहेत असे वाटते. जो आमच्या जवानांच्या मृत्यूस जबाबदार आहे, अशा शत्रू राष्ट्राच्या लष्कर प्रमुखाला ते अलिंगण कसे देऊ शकतात, असे जाट याने म्हटले आहे. सिद्धूंकडून पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखांना अलिंगण दिल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. सर्वांना सिद्धू यांना धडा मिळावा असे वाटत आहे. ज्यांनी देशाच्या सीमेच्या सुरक्षेसाठी आपल्या मुलाला गमावले आहे. अशा कुटुंबीयांना सिद्धूंच्या या कृत्यामुळे धक्का बसला आहे. लोक सिद्धूंच्या विश्वासघातकीपणाला कधीच माफ करणार नाहीत. या घटनेवर पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी देखील नाराजी व्यक्त केली होती.