Pimpri

सिक्युरिटी गार्डकडून हाऊस किपिंग करणाऱ्या व्यक्तीला मारण्याचा प्रयत्न

By PCB Author

November 16, 2021

पिंपरी, दि.१६ (पीसीबी) : सोसायटीत दोन दोन ठिकाणी काम करून पैसे घेत असल्याची मालकाला सांगून नोकरी घालवेल याचा राग आल्याने एका सिक्युरिटी गार्डने हाऊस किपिंग करणाऱ्या व्यक्तीला चाकूने भोसकून ठार मारण्याचा प्रयत्न केला. डेक्कन पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी आरोपीला अटक केली आहे.

अनिलकुमार नानकराम जग्याशी (रा. छत्तीसगड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी महेश मधुकर मालकोटगी (वय 44) यांनी फिर्याद दिली आहे. डेक्कन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी कर्वे रोड परिसरातील अरीहांत ल्डिंग मध्ये काम करतात. स्टील सिक्युरिटी गार्ड काम करणारा अनिल कुमार हा याच बिल्डिंगमध्ये सिक्युरिटी गार्ड व्यतिरिक्त इतर कामे करून पैसे घेतो हे फिर्यादी मालकाला सांगेल अशी भीती त्याला वाटत होती. याच रागातून त्याने ठार मारण्याच्या उद्देशाने त्याच्या पोटावर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेशवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस अधिक तपास करीत आहेत