सिंहगड रस्त्यावरील स्वागत लॉज वर सुरु असलेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; तीन महिलांची सुटका

0
1837

पुणे, दि. २८ (पीसीबी) – सिंहगड रस्त्यावरील ‘स्वागत लॉज’ येथे सुरु असलेल्या मोठ्या सेक्स रॅकेटचा सामाजिक सुरक्षा विभाग आणि सिंहगड पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई करुन पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून तीन महिलांची सुटका करण्यता आली आहे.

मयंककुमार भगवान पांड (वय २४, रा. बिहार) व शुभम तुफानी सिंह (वय ३८, रा. कात्रज,पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नवले ब्रीजजवऴ असलेल्या स्वागत लॉज येथे वेश्या व्यवसाय सुरु असल्याची खात्रीशीर माहिती एका खबऱ्याने सामाजिक सुरक्षा विभागाला दिली होती. यावर  सामाजिक सुरक्षा विभाग आणि सिंहगड पोलिसांनी संयुक्तरित्या स्वागत लॉजवर छापा टाकला. पोलिसांनी त्या ठिकाणाहून मयंमकुमार आणि शुभम या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता ते दोघे लॉजमधील कामगार असून गरीब महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याची कबुली दिली.