Pune

सिंहगडमध्ये भरदिवसा कोयत्याने वार करुन तरुणाचा खून

By PCB Author

January 27, 2019

पुणे, दि. २७ (पीसीबी) – सिंहगड रस्त्यावरील फन टाईम चित्रपटगृहाजवळ एका तरुणावर भरदिवसा चार जणांच्या टोळक्यांनी कोयत्याने सपासप वार करुन खून केला. ही धक्कादायक घटना आज (रविवारी) दुपारी साडेतीनच्या सुमारास घडली.

रोहित साळवी (वय २७) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साडेतीनच्या सुमारास चार तरुणांनी फन टाईम चित्रपटगृहाजवळ रोहितवर कोयत्याने सपासप वार केले. या हल्ल्यात रोहित गंभीर जखमी झाला. त्याल्या उपचारासाठी ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र  गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी असलेल्या सीसीटिव्हीच्या माध्यमातून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे. सिंहगड रोड पोलीस अधिक तपास करत आहेत.