Notifications

सिंचन घोटाळा; अजित पवारांबाबत भूमिका न्यायालयात स्पष्ट करू – मुख्यमंत्री  

By PCB Author

November 11, 2018

नागपूर, दि. ११ (पीसीबी) – सिंचन घोटाळा प्रकरणात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समावेशासंदर्भात मुंबईच्या न्यायालयात सरकारने भूमिका स्पष्ट केली आहे. मात्र, उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानेही पवार यांच्या समावेशासंदर्भात भूमिका स्पष्ट करण्याचे आदेश दिले आहेत. त्यासंदर्भात लवकरच प्रतिज्ञापत्र  सादर करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. नागपुरात  दिवाळी मिलन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.