Pune Gramin

“साहेब मारू नका मीच खून केला आहे” आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

By PCB Author

February 20, 2020

वडगाव, दि.२० (पीसीबी) – ट्रकमध्ये स्वयंपाक करीत असताना किरकोळ वादातून एका ट्रकचालकाने छातीकर कांदा कापण्याच्या सुरीने वार करत सहकारी ट्रक चालकाची निर्घुण हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना वडगाव मावळ पोलिस ठाण्याच्या हद्दीत मुंबई – पुणे महामार्गावर वडगाव – तळेगाव फाटा येथे बुधवारी (दि.१९) दुपारी अडीचच्या सुमारास ही घडना घडली.

राकेश जगजितसिंग यादव (वय ४४, रा. बामनेर, जि. मुरणा, मध्य प्रदेश) असे या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बांकेलाल व यादव हे दोघे त्यांचा ट्रक मुंबईकडून अहमदनगरकडे घेऊन जात होते. वडगाव – तळेगाव फाट्यावर त्यांनी ट्रक थांबविला. त्यावेळी स्वयंपाक करताना त्यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला. यात बांकेलाल जयनारायण ओझा ऊर्फ गौडा (वय ३८ रा. बामनेर, जि.मुरणा, मध्य प्रदेश) याच्या छातीवर आरोपी राकेश यादव याने कांदा कापण्याच्या सुरीने सपासप वार केले. यात गंभीर जखमी झाल्याने बांकेलाल याचा मृत्यू झाला. घटनेनंतर राकेश यादव पोलिसांकडे गेला . माझा सहकारी चालक बांकेलाल याचा कोणी तरी खून केला आहे. असे त्याने पोलिसांना सांगितले. मात्र, पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांना संशय आल्याने त्यांनी याबाबत सखोल चौकशी सुरू केली. उपनिरीक्षक दिलीप देसाई, विश्वास आंबेकर, कविराज पाटोळे, हेडकोन्स्टेबल मनोज कदम, गणेश तावरे, अमोल गवर यांनी आरोपी राकेश यादव याला पोलिस रिमांड मध्ये घेत खाकी वर्दी दाखवत साहेब मारू नका, मीच खून केला आहे असे सांगत आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. याप्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास वडगाव मावळ पोलिस करीत आहेत.