Notifications

साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांचा राजीनामा

By PCB Author

January 09, 2019

यवतमाळ, दि. ९ (पीसीबी) – ख्यातनाम  लेखिका नयनतारा सहगल यांचे  उद्घाटकपदाचे निमंत्रण ऐनवेळी रद्द केल्याने मराठी साहित्य संमेलन वादाच्या भोवऱ्यात अडकले असतानाच साहित्य मंडळाचे अध्यक्ष श्रीपाद जोशी यांनी पदाचा राजीनामा आज (बुधवार) दिला आहे.

जोशी यांनी विदर्भ साहित्य संघाच्या ई-मेलवर राजीनामा पाठवून   दिला आहे. तसेच सहकार्याबद्दल साहित्य संघाचे आभार मानले आहेत. आता महामंडळाच्या उपाध्यक्ष असलेल्या विद्या देवधर यांच्याकडे अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याची शक्यता आहे.