Pune

सासऱ्याच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

By PCB Author

October 23, 2019

पुणे, दि.२३ (पीसीबी) – सुखसागरनगर परिसरात सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

विजया नितीन कांबळे (वय ३९, रा. सुखसागरनगर) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, विजया व नितीन यांचा विवाह झाल्यानंतर किरकोळ कारणावरून वाद होत होते. विजया यांनी माहेरहून पैसे घेऊन यावे; म्हणून नितीन याने त्यांना त्रास देण्यास सुरुवात केली. त्यांनी पैसे आणण्यास नकार दिल्यानंतर शारीरिक व मानसिक त्रास दिला. त्यामुळे त्यानी १९ ऑक्टोबर रोजी राहत्या घरी विष पिऊन आत्महत्या केली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून, याप्रकरणी आरोपी पती नितीन वामन कांबळे (वय ४८) याला अटक करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलिस अधिक तपास करत आहेत.