सावधान…पिंपरी-चिंचवड शहरात कोरोनाचा कहर

0
495

पिंपरी, दि. ४ (पीसीबी) पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शहराच्या विविध भागातील 350 नवीन कोरोना बाधित रुग्णांची आज (मंगळवारी) नोंद झाली. तर, उपचाराला दहा दिवस पूर्ण झालेल्या आणि कोणतीही लक्षणे नसलेल्या 29 जणांना डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनामुळे एकाही रुग्णाचा आज मृत्यू झाला नाही. आजपर्यंत शहरातील 4 हजार 526 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरातील 2 लाख 79 हजार 922 जणांना आजपर्यंत कोरोनाची लागण झाली. सध्या 805 सक्रिय रुग्ण शहरात आहेत. त्यातील 572 रुग्ण गृहविलगीकरणात असून 233 सक्रीय रूग्णांवर महापालिका रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत.

तर, शहरात मेजर कंटेन्मेंट झोन 45 आणि मायक्रो कंटेन्मेंट झोन 308 आहेत. आज दिवसभरात 12 हजार 148 नागरिकांचे लसीकरण झाले. आजपर्यंत 30 लाख 1 हजार 447 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली.