सावधान! पिंपरी चिंचवडमधील ‘या’ गर्दीच्या भागात चोरींचे सत्र सुरूच; गोडाउनमधून तब्बल ‘एवढ्या’ लाखांची चोरी

0
540

पिंपरी, दि. २८ (पीसीबी) – कुलूप लावून बंद असलेल्या पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउनमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. गोडाउनमधून दोन लाखांचे साहित्य चोरून नेले. ही घटना 12 जुलै रोजी दुपारी बी ब्लॉक पिंपरी येथील पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउनमध्ये घडली.

याबाबत सतपाल प्रेमारामजी तौहर (वय 32, रा. विजयनगर, काळेवाडी) यांनी मंगळवारी (दि. 27) पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे पिंपरीमध्ये पॉलिथिन पॅकिंग मटेरियल गोडाउन आहे. 11 जुलै रोजी दुपारी पाच ते 12 जुलै रोजी दुपारी दोन या कालावधीत गोडाउन कुलूप लावून बंद होते. या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी गोडाऊनचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. गोडाऊनमधून दोन लाख रुपयांचे पॉलिथिन मटेरियल चोरून नेले. दरम्यान फिर्यादी आजारी असल्याने त्यांनी मंगळवारी याबाबत फिर्याद दिली. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.