Maharashtra

सावधान: पाचशेच्या नोटा जपून वापरा; घडी घालताच पडत आहेत तुकडे

By PCB Author

May 16, 2019

सांगली, दि. १६ (पीसीबी) – पाचशे रुपयांच्या नोटांची घडी घालताच त्या तुटून पडत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आली आहे. सांगलीतील विटा येथे हा प्रकार घडला आहे.

सामाजिक कार्यकर्ते अनिल राठोड यांनी विट्यातील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक महेश दळवी यांच्या निदर्शनास ही गोष्ट आणून दिली असून प्रात्यक्षिकही दाखवले. अनिल राठोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, जवळपास ५०० रुपयांच्या १४ नोटांच्या बाबत हा प्रकार घडला असून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने तात्काळ दखल घ्यावी अशी मागणी केली आहे.