सावधान! ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएमची ‘अशी’ झाली अदलाबदल

0
321

पिंपरी, दि.१८ (पीसीबी) : मिनी स्टेटमेंट काढून देण्याच्या बहाण्याने एका भामट्याने ज्येष्ठ नागरिकाच्या एटीएमकार्डची अदलाबदल करून त्या एटीएममधून 59 हजार रूपये काढून घेत फसवणूक केली. ही घटना 14 ऑक्टोबर रोजी सकाळी पावणेदहाच्या सुमारास पिंपळेगुरव येथे घडली. याप्रकरणी रघुनाथ शंकर पाटील (वय 77, रा. पिंपळे गुरव) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार एका अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी पाटील हे 14 ऑक्टोबर रोजी पिंपळे गुरव येथील एसबीआय बँकेत पासबुकवर नोंद करण्यासाठी गेले होते. त्यावेळी अनोळखी व्यक्तीने मिनी स्टेटमेंट काढून देण्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला. त्यांचे एटीएम घेऊन मिनी स्टेटमेंट काढून दिले. मात्र, एसबीआय बँकेचे जयंतीलाल गोहिल या नावाचे एटीएम आरोपीने फिर्यादी यांना दिले. त्यानंतर आरोपीने फिर्यादी यांच्या एटीएम कार्डचा वापर करून 59 हजार 200 रूपये काढून घेत फसवणूक केली. याप्रकरणी सांगवी पोलीस तपास करत आहेत.