सावधान….आता या नवीन आजाराचा अमेरिकेत शिरकाव.

0
486

वाॅशिंग्टन, दि. २६(पीसीबी) : अमेरिकेतील कोरोना बाधीतांचा आकडा छातीत धडकी भरवणारा आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची शक्यता खूपच कमी असताना अमेरिकेत आता नव्या विचित्र आजारानं शिरकाव केला आहे. ‘सायक्सोस्पोरा’ या नव्या आजाराचे रूग्ण अमेरिकेतील तब्बल ११ राज्यांत आढळून आले आहेत.

आत्तापर्यत अमेरिकेत या आजाराने तब्बल ६४० लोकांना विळखा घातला असून रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. पॅकेट्समध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलेड्समुळे हा ‘सायक्सोस्पोरा’ नावाच्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे.

कोबी , गाजर या भाज्यांचे सॅलेड्स या पॅकेटमध्ये असतात. ‘सायक्सोस्पो’रा या आजाराची लागण झालेल्या या रुग्णांपैकी आता ३७ जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.भूक न लागणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा, पोट फुगणे हि लक्षणे ‘सायक्सोस्पोरा’ या आजारात आढळून येत आहेत. पॅकेट्समधील अन्न किंवा पाणी प्यायल्यास आठवड्याच्या कालावधीनंतर या आजराच्या लक्षणांचा धोका बळावण्यास सुरूवात होत आहे.