सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ‘एवढ्या’ जणांवर कारवाई

0
251

पिंपरी, दि. १४ (पीसीबी) – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मास्कचा वापर बंधनकारक करण्यात आला आहे. मात्र, तरीही काही नागरिक अजूनही मास्क वापरत नाहीत. अशा बेशिस्त नागरिकांवर पोलीस कारवाई करीत आहेत.

गुरुवारी (दि. 13) पिंपरी-चिंचवड पोलिसांनी 310 जणांवर कारवाई केली आहे.

एमआयडीसी भोसरी (47), भोसरी (12), पिंपरी (14), चिंचवड (26), निगडी (21), आळंदी (21), चाकण (26), दिघी (03), सांगवी (26), वाकड (06), हिंजवडी (14), देहूरोड (16), तळेगाव दाभाडे (28), तळेगाव एमआयडीसी (00), चिखली (09), रावेत चौकी (15), शिरगाव चौकी (15), म्हाळुंगे चौकी (11).