Bhosari

सारंग कामतेकर युथ फाऊंडेशन तर्फे पुरग्रस्तांना धान्याची मदत

By PCB Author

August 09, 2019

भोसरी, दि. ९ (पीसीबी) – कोल्हापुर आणि सांगली जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे जणजीवन विसकळीत झाले आहे. या ठिकाणी हजारो नागरिकांचे नुकसान झाले असून बऱ्याच परिवारांचे संसार उघड्यावर आले आहेत.

या भागात अडकलेल्या नागरिकांची खाण्या पिण्याची गैरसोय होत आहे. यामुळे तेथील नागरिकांना मदतीचा हात म्हणून भोसरीतील सारंग कामतेकर युथ फाऊंडेशनच्या वतीने कोल्हापुर आणि सांगलीतील महापुरात अडकलेल्या नागरिकांना धान्य आणि घरउपयोगी वस्तू पाठवण्यात आल्या.

यावेळी फाऊंडेशनचे अध्यक्ष विशाल हाके, सागर भोसले, ईश्वर अभंग, अरुण गरड आणि विशाल सावंत उपस्थित होते.