Bhosari

सारंग कामतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरीच्या अंधशाळेतील मुलांना खाऊचे वाटप

By PCB Author

March 25, 2019

भोसरी, दि. २५ (पीसीबी) – सांरग कामतेकर स्पोर्टस फाऊंडेशनच्या वतीने भाजपचे शहर सरचिटणीस सारंग कामतेकर यांच्या वाढदिवसानिमित्त भोसरी, पांजरपोळ येथील पताशीबाई रतनचंद मानव कल्याण ट्रस्टच्या अंधशाळेतील मुलांना सानिका सारंग कामतेकर यांच्या हस्ते सोमवारी (दि. २५) खाऊचे वाटप करण्यात आले.

यावेळी सारंग कामतेकर स्पोर्टस् फाऊंडेशनचे कांबळे सर, बाबुराव लोंढे, विशाल हाके, रोहित बोराडे, सूरज बनकर, संदिप नलावडे, सचिन वाघ, सतार, सागर भोसले, प्रदीप मुंडे, ईश्वर अभंग आदी उपस्थित होते.