सायन्स पार्क शनिवारपासून खुले; परंतु, ‘या’ नवीन नियमांचे पालन करणे असेल बंधनकारक….

0
255

पिंपरी, दि.२८ (पीसीबी) : मागील वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सायन्स पार्क सर्वांसाठी बंद करण्यात आले होते. मात्र आता कोरोना परिस्थिती आटोक्यात येताना दिसत असताना तब्बल दहा महिन्यानंतर पिंपरी-चिंचवड सायन्स पार्क नागरिकांसाठी खुले होणार आहे. येत्या शनिवार (दि.30) पासून सायन्स पार्क प्रेक्षकांसाठी नियमितपणे सुरु होत आहे.

मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता या पार्श्वभूमीवर काही नवीन नियम सायन्स पार्कने नागरिकांसाठी लागू केले आहेत. अनलॉक पाचमध्ये अनेक पर्यटन, शैक्षणिक व धार्मिक स्थळे, विविध संग्रहालये सुरु करण्यात येत आहेत. यानुसार सायन्सपार्क देखील शनिवारपासून नियमितपणे सुरु होत आहे. सायन्स पार्कला भेट देताना कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करणे बंधनकारक राहील. तर दहा वर्षाखालील बालके व ज्येष्ठ नागरिकांना प्रवेश दिला जाणार नाही. मास्क वापरणे बंधनकारक राहिल. प्रदर्शन पाहताना एकमेकांमध्ये योग्य अंतर ठेवणे बंधनकारक आहे.