“सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा संदेश घेऊन प्रजासत्ताक दिनी सायकल रॅलीचे आयोजन

0
862

पिंपरी, दि.३० (पीसीबी) – “सायकल चालवा पर्यावरण वाचवा” हा संदेश घेऊन चिंचवड येथील गरवारे टेक्निकल फायबर्स लिमिटेड या कंपनीने २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी सायकल रॅलीचे आयोजन केले होते. पहाटे सव्वा सहा वाजता चांदणी चौक येथून रॅलीला सुरवात करण्यात आली.

सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून गरवारे कंपनीकडून नेहमीच वेगवेगळ्या उपक्रमाचे आयोजन केले जाते, वृक्षारोपण,जलसंधारण,पुणे मॅरेथॉन,रस्ता सुरक्षा सप्ताह, प्लास्टिक मुक्त गडकिल्ले याकरीता कंपनी नेहमीच एक पाऊल पुढे असते. अशा उपक्रमात कंपनीचे कामगार व कर्मचारी वर्ग नेहमीच उत्स्फूर्त सहभागी होत असतात. कोथरूड, कर्वे रोड,डेक्कन गरवारे पूल मार्गे निघून  रॅली औंध चौकात पोहचली व तिथून पुढे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात येऊन या रॅलीची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.  यावेळी कंपनीचे मुख्य व्यवस्थापण अधिकारी प्रबोध कामत यांनी सर्व सहभागीना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्या देताना, पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवा व इंधन बचतीबरोबरच,स्वतःचे आरोग्य निरोगी रहाण्यासाठी प्रत्येकांनी आठवड्यातून एकदा तरी सायकल चालविली पाहिजे असे सांगितले.

 

 या रॅलीमध्ये, कंपनीतील वरिष्ठ अधिकारी, राघवेंद्र मिश्रा, केतन कुलकर्णी, सुधीर राणे, विलास आरेकर, गणेश भोसले, डी. व्ही. कुलकर्णी, संघटनेचे अध्यक्ष जयवंत खाटपे, जनरल सेक्रेटरी माधव ढमाले, इतर पदाधिकारी व कामगार व कर्मचारी या रॅलीमध्ये मोठ्या संख्येनी सहभागी होते.