‘सामना’ सरकार चालवत नाही, तर मी सरकार चालवतो; मुख्यमंत्र्यांचा शिवसेनेला टोला

0
1161

मुंबई, दि. ३० (पीसीबी) – शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ च्या अग्रलेखातून राज्यातील भाजप सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर होणाऱ्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्र सरकारचे काही चुकले की सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात येते. त्याचबरोबर पंतप्रधान मोदी यांच्यावरही निशाणा साधण्यात येतो. मात्र, सामना सरकार चालवत नाही, तर मी सरकार चालवतो, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, गेल्या चार वर्षात राज्याने अपेक्षित प्रगती साधली आहे. त्यामुळे पुढच्या टर्मला मीच मुख्यमंत्री असेन, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

२०१९ मध्ये मी मुख्यमंत्री होईन आणि शिवसेना मलाच पाठिंबा देईल, असे ते म्हणाले. शिवस्मारकाची जागा आघाडी सरकारने निश्चित केली होती. मात्र, आता जागा बदलणे चुकीचे ठरेल. स्मारक आम्हीच पूर्ण करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल नोव्हेंबर अखेरपर्यंत मागास आयोगाला देण्यात येणार आहे. त्यासाठी आम्ही सर्व पक्षांचे सहकार्य घेत असल्याचे त्यांनी सांगितले.