‘सामना’तील अग्रलेख लता मंगेशकरांच्या आवाजापेक्षाही गोड – धनंजय मुंडे

0
523

मुंबई, दि. २० (पीसीबी) – . ‘सामना’मधील आजचा अग्रलेख गायिका लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे, वाचलात का, असा उपरोधिक सवाल  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केला आहे.  भाजप-शिवसेना युतीवरून ‘सामना’मध्ये आज (बुधवार) प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखाचा दाखला देत त्यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.

जनतेच्या मनात कमी, पण आमच्या राजकीय विरोधकांच्या डोक्यात प्रश्नांचे किडे जरा जास्तच वळवळत आहेत. ‘युती’मुळे हे किडेमकोडे साफ चिरडले जातील या भीतीतून त्यांची वळवळ सुरू झाली असल्याचा टोला लगावला होता. याच अग्रलेखाचा आधार घेत मुंडे यांनी शिवसेनेवर टीका केली आहे.

धनंजय मुंडे यांनी शाहरूख खान, प्रीती झिंटा अभिनित वीर-झारा चित्रपटातील गाण्याचे कडवे “तेरे लिए हम हैं जिये होठों को सीये” ट्विट केले असून ‘सामना’मधील आजचा आग्रलेख लता मंगेशकर यांच्या आवाजापेक्षाही गोड आहे. वाचलात का, असा सवाल केला आहे.