Pimpri

साबण खरेदीतही अधिकार्यानी लुटले!

By PCB Author

July 17, 2020

– ५० लाखांच्या व्यवहारात महापालिकेचे ५ लाखांचे नुकसान – भांडार विभागप्रमुखांचा ‘अर्थ’पूर्ण कारभार   

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी – चिंचवड महापालिकेने झोपडपट्टीधारकांना निकृष्ट दर्जाचे मास्क पुरविल्याचे सिद्ध झाले असताना झोपडीधारकांसाठीच्या लाईफबॉय साबण खरेदीतही भ्रष्टाचार झाल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. ‘श्रीमंत’ महापालिकेच्या मध्यवर्ती भांडार विभागाने एकाच पुरवठादाराकडून तीनवेळा वेगवेगळ्या किमतीला लाईफबॉय साबणाची खरेदी करत चार लाख ८८ हजार ६७४ रुपयांची कमाई केल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. मास्क खरेदीपाठोपाठ साबण खरेदीतही ‘अर्थ’पुर्ण व्यवहार करणाया भांडारप्रमुख मंगेश चितळे यांच्यावर आता कारवाई होणार का याकडे आता लक्ष लागले आहे.  

कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यावर महापौर उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी १३ एप्रिल रोजी बैठक घेतली. शहरातील झोपडीधारकांना हात धुण्यासाठी साबण द्यावेत, असे आदेश प्रशासनाला दिले. त्यानुसार, भांडार विभागप्रमुख मंगेश चितळे यांनी १२५ गॅम वजनाचे १ लाख ६० हजार लाईफबॉय साबण खरेदी करण्याचा निर्णय घेतला. जिंदल ट्रेडींग कंपनीकडून तीनवेळा साबण खरेदी करण्यात आली. १८ एप्रिलरोजी २० रुपये १७ पैशांनी एक लाख २१ हजार २१२ साबणांची तर, २२ एप्रिल रोजी १८ रुपये १७ पैशांनी ३८ हजार ७८८ आणि ३ जून रोजी याच पुरवठादाराकडून २० रुपये १४ पैशांनी एक लाख २५ हजारांच्या साबनवड्यांची खरेदी करण्यात आली. 

एकाच पुरवठाधारकाकडून वेगवेगळ्या किमतीमध्ये साबण खरेदी करण्याच्या व्यवहारावर त्रिसदस्यीय चौकशी समितीने बोट ठेवले आहे. तसेच, मध्यवर्ती भांडार विभागाकडे याबाबत लेखी खुलासा मागविला.आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्चा तेलाच्या किंमतीनुसार लाईफबॉय साबणाच्या किंमतीमध्ये वाढ अथवा घट होत असते. त्यानुसार किंमत निर्धारीत होते, असे पुरवठादाराचे म्हणणे असल्याचे जुजबी कारण भांडार विभागाने पुढे केले. तथापि, हा खुलासा त्रिसदस्यीय चौकशी समितीने अमान्य केला. लाईफबॉय साबण पुरवठादार जिंदल ट्रेडींग वंâपनी हे अधिकृत वितरक असून त्यांनी केवळ माल पुरवठा केला. किंमत निश्चिती हिंदुस्थान युनीलिव्हर कंपनीने केल्याचा निष्कर्ष चौकशी समितीने काढला आहे. 

तीनवेळा झालेल्या साबण खरेदीत तीन वेगवेगळ्या किमती पुरवठादाराला अदा करण्यात आल्या. १८ रुपये १७ पैसे ही न्युनतम किंमत विचारात घेता २० रुपये १७ पैसे आणि २० रुपये १४ पैसे या दराने साबण खरेदी केल्यामुळे ४ लाख ८८ हजार ६७४ रुपये पुरवठादाराला अतिरिक्त मोजण्यात आल्याचा ठपका चौकशी समितीने ठेवला आहे. नावाजलेल्या आणि मक्तेदारी असणाNया हिंदुस्थान युनीलिव्हर या उत्पादक कंपनीकडे पाठपुरावा करुन भांडार विभगाने ही रक्कम ‘विशेष बाब’ परत मिळवावी,अशी शिफारसही चौकशी समितीने केली आहे. भांडारप्रमुख मंगेश चितळे यांच्याशी संपर्वâ साधला असता ते म्हणाले, त्रिसदस्यीय चौकशी समितीचा निष्कर्ष अमान्य आहे. साबण खरेदीचे स्पष्टीकरण आयुक्त श्रावण हर्डीकर यांना पुन्हा एकदा सादर करणार आहे.   

———————— खरेदी मान्यता १ लाख ६० हजार साबणांची, प्रत्यक्षात खरेदी २ लाख ८५ हजार साबणांची झोपडीधारक आणि गरीब – गरजू नागरिकांना महापालिकेने साबणवड्या मोफत द्याव्यात, त्यासाठी कमाल २ लाख साबणांची खरेदी करावी, असे लेखी पत्र महापौर उषा ढोरे आणि सभागृहनेते नामदेव ढाके यांनी मध्यवर्ती भांडार विभागाला दिले. तर, झोपडीधारकांसाठी १२५ ग्रॅम वजनाचे १ लाख ६० हजार साबणवड्या खरेदी करण्यास आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी मान्यता दिली. मात्र, खरेदीतील ‘टक्केवारी’ त बरबटलेल्या मध्यवर्ती भांडार विभागाने आयुक्तांचा आदेशही केराच्या टोपलीत टाकत २ लाख ८५ हजार साबणवड्यांची खरेदी करत महापालिकेला घाट्यात घातले.